Chakan News: JBM कंपनी कामगारांच्या अन्यायाविरोधात मनसेचे आंदोलन
Pckhabar-JBM कंपनी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चाकण-तळेगाव मार्गावर म्हाळुंगे येथे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे व मनसे पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे, मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष समिर थिगळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन चिखले, हेमंत डांगे, अंकुश तापकीर, राजू सावळे, सुशांत साळवे, निलेश पवार, रोहित काळभोर, विशाल मानकरी, सुजाता काटे, राजू सावळे, मनवीसे पुणे जिल्हा अध्यक्ष आशिष साबळे, मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, मनसे कामगार सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज खराबी, आळंदी शहराध्यक्ष अजय तापकीर, विभाग अध्यक्ष मंगेश आबा कुबडे , सागर बर्डे व असंख्य मनसे पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.










Leave a Reply