Bhosari crime news: धक्कादायक: हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Pckhabar-आई-वडिल कामाला गेल्यानंतर शेजारी राहणार्या तरूणाने अल्पवयीन मुलीला तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन अशी धमकी देत तिचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना भोसरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
संदिप राजू भुतके (वय-29, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत आणि आरोपी भोसरीमध्ये एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. पिडीत मुलीचे आई-वडिल कामाला गेल्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला धमकी देत टेरेसवर नेले. ओढणीने तिचे तोंड बांधून दोरीने हातपाय बांधले. तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. कोणाला-काही सांगितल्यास आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.










Leave a Reply