Dehu news: जनजागृती सामाजिक मंच, नारी शक्तीतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन, गॅस कनेक्शन

 

Dehu news: जनजागृती सामाजिक मंचातर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन, गॅस कनेक्शन

Pckhabar-जनजागृती सामाजिक मंच आणि नारीशक्तीच्या वतिने गरजू महिलांना शिलाई मशीन, गॅस कनेक्शन देण्यात आले.

मंचातर्फे  महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पद्मश्री सुहास मापुसकर एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतिने गँस व शिलाई मशिन वाटप सौ सोनाली मापुस्कर व सोनिया सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कुमारी श्वेता अशोक काळोखे ही तरुणी सिए परिक्षेत आणि दीपिका कलवले, मोटार वाहन निरिक्षक पदी निवड झाल्या बद्दल यांचा विशेष सन्मान अध्यक्ष प्रकाश काळोखे व शुभांगी कलांगे यांच्या हस्ते  सन्मानित  करण्यात आले. तसेच लेखिका मेहमुदा शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
उल्हास मापुसकर,व्याख्याते प्रा. प्रदिप कदम यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

जनजागृती सामाजिक मंचाचे अध्यक्ष प्रकाश काळोखे, अध्यक्षा शुभांगी कलांगे,  माऊली काळोखे,  दिलीप गोसावी इनामदार, दिलीप टिळेकर, अँड भाऊसाहेब काळोखे, उषा ढवळे, कावेरी काळे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिगंधा खोल्लम यांनी केले तर भाग्यश्री यादव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *