Dighi News: शिबिरात ५०५ नागरिकांची ह्रदयरोग तपासणी
Pckhabar- भाजपचे नगरसेवक विकासभाऊ डोळस, युवानेते कुलदिपभाऊ परांडे, संकल्पना प्रतिष्ठाण आणि संघर्ष स्पोर्टस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
शिबिरात तब्बल ५०५ नागरिकांची
ह्रदयरोग तपासणी करण्यात आले.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड, माजी सैनिक संघाचे अध्यक्ष अशोकराव काशिद , ह.भ प गोडसे गुरूजी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक विकासभाऊ डोळस, युवानेते कुलदिपभाऊ परांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक विकासभाऊ डोळस म्हणाले” नागरिकांचे ह्रदय चांगले आरोग्य रहावे, या मुख्य उद्देशाने ह्रदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला”.










Leave a Reply