Sindhudurg News: मुख्यमंत्री पदाबाबात उद्धव ठाकरे खोटे बोलले : अमित शहा
Pckhabar- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचे खोटे बोलत असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असंही त्यांनी नमूद केले.
(Amit Shah say CM Uddhav Thackeray lying about CM promise in Maharashtra).
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्गमधील लाईफटाईम महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.
अमित शाह म्हणाले, “मी आज महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायला आलोय की तुम्ही जो जनादेश दिला होता त्या पवित्र जनादेशाचा अनादर करण्यात आला.
एक अपवित्र आघाडी करुन सत्तेच्या लालसेपोटी येथे सरकार स्थापन झालं. जनादेश नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचा होता. ते म्हणतात आम्ही वचन तोडलं. आम्ही वचन पाळणारे लोक आहोत. आम्ही असं ढळढळीत खोटं बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही ठरल्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी भाजपचा मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला. आज नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत.”
“उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथं आलोय,” असंही अमित शाह म्हणाले.










Leave a Reply