Sangvi news: सांगवीतील मराठी प्राथमिक शाळेला महेश मंडळातर्फे विविध साहित्याची मदत

Sangvi news: सांगवीतील मराठी प्राथमिक शाळेला महेश मंडळातर्फे विविध साहित्याची मदत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील आज गुरुवारपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सांगवीतील महेश मंडळातर्फे जनता शिक्षण संस्थेच्या मराठी शाळेला सोडियम क्लोराईड फवारणी यंत्र, तापमान यंत्र, ऑक्सिजन यंत्र आणि सॅनिटायझरसह आदी साहित्य भेट देण्यात आले.

याप्रसंगी स्थानिक नगरसेविका शारदाताई सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते हिरेन सोनवणे, महेश मंडळाचे सतिश लोहिया आदी उपस्थित होते.

कोरोना च्या जागतिक महामारीमुळे गेल्या 11 महिन्यापासून बंद असलेल्या शाळा आजपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहेत. कोरोना अद्याप गेला नसून खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यात येत आहेत. शाळेसाठी महेश मंडळाने सोडियम क्लोराईड फवारणी यंत्र, तापमान यंत्र, ऑक्सिजन यंत्र आणि सॅनिटायझरसह आदी साहित्य भेट दिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *