Bhosari news: ललित कला आकादमीच्या प्रयत्नाबाबत आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

 

Bhosari news: ललित कला आकादमीच्या प्रयत्नाबाबत आमदार महेश लांडगे यांचा सन्मान
Pckhabar-ललित कला अकादमी पिंपरी चिंचवड़ महापालिका हद्दीत सुरु करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्याबाबत आमदार महेश लांडगे यांचा विविध संस्था व पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला.

वैश्विक कला पर्यावरण पुणेचे संस्थापक भास्कर हांडे, कलाकार व कलाध्यापक दिलीप माळी, छायाचित्रकार अविनाश थोरात, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी आमदार लांडगे यांचा सन्मान केला.

ललितकला अकादमी ह्या भारत सरकारच्या कलेसंबंधित संस्थेची पश्चिम भारतातील विभागीय शाखा पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील भोसरी येथील जागेत सुरु होत आहे. ललित कला अकादमी अध्यक्ष शिल्पकार उत्तम पाचारणे यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राला ह्या शाखेची सुविधा उपलब्ध होत आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या सकारात्मक निर्णय व हस्तांतरण प्रक्रियेत स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी सिंहाचा वाटा उचलला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आमदार लांडगे यांना ललित कला अकॅडमीसंबंधी अचूक माहिती सांगितली.

ह्या संस्थेमुळे महानगरपालिका हद्दीत एक महान व महत्वाची संस्था समाविष्ट होत आहे, असे प्रतिपादन या वेळी आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

भास्कर हांडे म्हणाले की, कलाशाखा, सामान्य कला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व कलासक्त कलावंतांना सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन देणारी ठरेल. ललित कला अकादमी व महाराष्ट्रातील कलावंतांच्या वतीने त्यांचे आभार मानले जाणे अतिमहत्वाचे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *