Dehu news: चार हजार 650 बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

Dehu news: चार हजार 650 बालकांना लसीकरण
Pckhabar- देहूगाव परिसरातील 22 बूथवर चार हजार 650 बालकांना रविवारी पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.

देहूगाव परिसरातील 15 लसीकरण केंद्रावरील 22 बूथवर 54 कर्मचाऱ्यांनी ही लसीकरण मोहीम यशस्वी पार पडली.

याबाबत माहिती देताना मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव म्हणाले”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी घेत 22 बूथवर लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहीम यशस्वी पार पाडल्या बदल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *