Pune news: राम मंदिरासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचे समर्पण

Pune news: राम मंदिरासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचे समर्पण

Pckhabar-अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीसाठी आज आ. चंद्रकांत पाटील निधी संकलन अभियाना अंतर्गत समर्पण केले. श्री. पाटील यांनी समर्पण निधीचा धनादेश पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भागाचे संघचालक दिगंबरजी परुळेकर, संभाजीनगर कार्यवाह सुधीरजी जवळेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, सुधीरजी पाचपोर आदी उपस्थित होते.

 

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशभरात निधी संकलन अभियान सुरु असून आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपले योगदान दिले. श्री. पाटील यांनी आज सकाळी आपल्या समर्पण निधीचा धनादेश पुणे महानगर संघचालक रविंद्रजी वंजारवाडकर यांच्या कडे सुपूर्द केला.

समर्पणानंतर श्री. पाटील म्हणाले की, “प्रभू श्रीराम आमचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत भव्य मंदिर उभारणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी समर्पण म्हणजे आमची श्रद्धा आहे.”

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *