
Pckhabar-केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार उद्या (रविवार) राष्ट्रीय
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करावे. देहू परिसरात 15 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर जावून बालकांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.
देहूगाव परिसरातील 5 वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी 15 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील व आपल्या शेजारी राहणार्या 5 वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण लसीकरण करुन घ्यावे. बाळ नुकतेच जन्मलेले असेल, यापूर्वी डोस दिला असेल तरीही पोलिओ लसीकरण करून घ्यावे. तसेच बाळ आजारी असल्यास डॉक्टरांच्या सल्याने पोलिओ लसीकरण करून घ्यावे.
पालकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतर ठेवावे. मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. नागरिकांनी एकाच केंद्रावर गर्दी न करता आपल्या घराजवळ्या केंद्रावर जावून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.
देहूगाव परिसरातील लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे –
1) प्राथमिक आरोग्य केंद्र, मुख्यालय आणि नेत्र कक्ष, देहू
2) हनुमान मंदिर- नगर पंचायत कार्यालय, देहू
3) शिरीष मित्र मंडळ, गणेश मंदिर, बाजारपेठ, देहू
4) संत तुकाराम विद्यालय, वडाचा माळ, देहू
5)अंगणवाडी केंद्र क्र.2, वडाचा माळ, देहू
6) ब्रम्हकमळ हॉस्पिटल आणि शशांक डेंटल क्लिनिक, विठ्ठलवाडी रोड
7)महादेव मंदिर, भिमाशंकर सोसायटी, तळ्याचा माथा, देहू
8)संत तुकाराम तरूण मंडळ तालिम, विठ्ठलवाडी
9) अंगणवाडी केंद्र क्र.2 विठ्ठलवाडी
10) अंगणवाडी केंद्र क्र. 3, विठ्ठलवाडी
11) विठ्ठलमंदिर, मुख्य रस्ता, विठ्ठलवाडी
12)अंगणवाडी, माळवाडी
13)राधाकृष्ण लॉन्स कार्यालय, माळवाडी
14)सावता माळी मंदिर, माळवाडी
15)अंगणवाडी, बोडकेवाडी
या पंधरा ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.










Leave a Reply