Nigdi news: प्रियकराने लग्नास नकार दिला, तरूणीची गळफास घेत आत्महत्या

Nigdi news: प्रियकराने लग्नास नकार दिला, तरूणीची गळफास घेत आत्महत्या
Pckhabar-लग्नाचे आश्वासन देऊन लग्न करण्यास नकार देत तरूणीला शिवीगाळ करत मानसिक छळ केला. यामुळे नैराश्य आलेल्या तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी प्रियकरावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय बाळासाहेब राऊत (वय-23, मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी धनंजय यांचे प्रेमसंबंध होते. आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, आरोपीने लग्न करण्यास नकार देत तिला शिवीगाळ आणि मानसिक छळ केला. यातून आलेल्या नैराश्यातून तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली. तसेच तरूणीने आत्महत्या करण्यापुर्वी दोन चिठ्या लिहून धनंजय राऊत याने फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *