Pimpri news: चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्कची आवश्कता नाही
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात चारचाकी खासगी वाहनातून सहकुटुंब प्रवास करताना आता मास्कची आवश्यकता नाही, तसे आदेश प्रभारी आयुक्त सुहास दिवसे यांनी काढले आहेत. मात्र, वाहनातील व्यक्ती एका कुटुंबातील असणे बंधनकारक आहे. वाहनचालक अन्य असल्यास मास्क वापरणे बंधनकारक आहे.
कोरोना काळात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, शहरातील कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वाहनातून प्रवास करताना मास्क घालण्याच्या नियमांत बदल करण्यात आला आहे.










Leave a Reply