Dehu news: जन जागृती सामाजिक मंचच्या वतीने कोरोना योध्दांचा सन्मान

Pckhabar-कोरोना कालावधीत जीवाची परवा न करता कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांचा जन जागृती सामाजिक मंच देहू यांच्या वतीने ‘कोरोना योध्दा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आशा वर्कर आदी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याबद्दल त्यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महसूल विभागाचे अतुल गिते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड विभागाचे मंडलअधिकारी शेखर शिंदे, तलाठी भाऊसाहेब अतुल गिते, शिवव्याख्याते आणि conquest कॉलेजचे प्राचार्य प्रा.प्रदीप कदम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख तथा नेत्ररोग तज्ञ डॉ.किशोर यादव, डॉ.कांबळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंचाचे अध्यक्ष प्रकाश काळोखे, उपाध्यक्ष शुभांगी कालिंगे, सचिव दिलीप महाराज मोरे, खजिनदार निशिगंधा खोल्ल्मम, सहखजिनदार भाग्यश्री यादव, मंचाचे सभासद दत्तात्रय बांगर, दिलीप टिळेकर, प्रा.आण्णासाहेब लावंड, सुबोध मोरे, ॲड भाऊसाहेब काळोखे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता दिवेकर यांनी केले.










Leave a Reply