Chinchwad news: सायन्स पार्क शनिवारपासून प्रेक्षकांसाठी होणार खुले
Pckhabar- कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेले पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येत्या शनिवारपासून प्रेक्षकांसाठी खुले होणार असल्याची माहिती सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सायन्स पार्क 15 मार्च 2020 पासुन प्रेक्षकांसाठी बंद होते. महाराष्ट्र शासनाच्या अनलॉक 5 नुसार अनेक पर्यटन, शैक्षिणक व धार्मिक स्थळे विविध संग्रहालये सुरू करण्याचे धोरण अवलंबले आहे. यानुसार पिंपरी चिंचवड सायन्स पार्क लॉकडाऊननंतर 30 जानेवारी 2021 पासून प्रेक्षकांसाठी नियमितपणे सुरु होत आहे.
सायन्स पार्कला भेट देताना प्रेक्षकांनी अटी-शर्तीचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना संदर्भात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहिल. 10 वर्षाखालील बालके व जेष्ठ नागरिकांना प्रवेश नाही. मास्क वापरणे बंधनकारक राहिल. सायन्स पार्कमध्ये प्रदर्शन पाहताना नागरिकांनी योग्य अंतर ठेवावे.










Leave a Reply