Dehu news: मोफत ब्युटी पार्लर कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pckhabar- ‘महिलांच्या सबलिकरणासाठी’ कर्तव्य फाऊंडेशन देहूगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत ब्युटी पार्लर कोर्सची सुरुवात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आली. या मोफत ब्युटी पार्लर कोर्सला देहू आणि परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कोर्सच्या माध्यमातून 63 महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या महिलांना योगिता पवार, प्रीती थोटे, कर्तव्य फाऊंडेशनच्या सदस्या ज्योती (माई) चोपडे, निशुल्क मार्गदर्शन करीत आहे.
कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य म्हणाले ” कोरोनाच्या जागतिक महामारीने अनेकांचे रोजगार गेले आहेत. महिलांनाही घर बसल्या व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, या प्रमुख उद्देशाने मोफत ब्युटी पार्लर कोर्सची संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पनेला सत्यात उतरविण्यासाठी योगिता पवार, प्रीती थोटे,
कर्तव्य फाऊंडेशनच्या सदस्या ज्योती (माई) चोपडे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्याबद्दल कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने त्यांचे मनापासून आभारी आहोत”.










Leave a Reply