Talegaon Dabhade news: यशवंतनगरमध्ये उपआयुक्त दीपक झिंजाड यांच्या हस्ते झेंडावंदन

Talegaon Dabhade news: यशवंतनगरमध्ये उपआयुक्त दीपक झिंजाड यांच्या हस्ते झेंडावंदन


Pckhabar- प्रजासत्ताक दिनानिमित्त यशवंत नगरमध्ये तळेगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच भिवंडी इस्लामपूर महानगर पालिकेचे नवनियुक्त उपआयुक्त दीपक झिंजाड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

याप्रसंगी यशवंत नगरचे नगरसेवक निखिल भगत, यशवंत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, समस्त तळेगावकरांची कोरोना काळात विशेष काळजी घेतल्याबद्दल आणि भिवंडी इस्लामपूर महानगर पालिकेच्या उपआयुक्त पदी निवड झाल्याबद्दल झिंजाड यांचा नगरसेवक भगत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संविद पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *