PCMC news: महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बदलीचे वेध
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे बुधवारपासून आठ दिवसांच्या रजेवर जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या विकास कामांना खीळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयुक्त हर्डीकर हे डिसेंबर 2020 मध्येच आठ दिवस रजेवर गेले होते. त्यानंतर एक महिन्याच्या आत आयुक्त पुन्हा आठ दिवसांच्या रजवेर जात आहेत. त्यांचा पिंपरी महापालिकेत चार वर्षांचा कार्यकाळ झाला असून नुकतीच त्यांची सचिवपदी बढतीही झाली आहे. त्यामुळे हर्डीकर यांना मंत्रालयाचे वेध लागले आहेत.
आयुक्त हर्डीकर यांच्याकडील पदभार पीएमआरडीएचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याकडे देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.










Leave a Reply