School news: पाचवी ते आठवीचे वर्ग 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार

 

School news: पाचवी ते आठवीचे वर्ग 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार
Pckhabar-नववी ते बारावीचे वर्ग सुरुळीत सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने  इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाचवी ते आठवीचे वर्ग  4 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, खासगी शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नाही.

महापौर ढोरे आणि पक्षनेते ढाके म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांचा टप्याटप्याने निर्णय घेण्यात आहे. 27 जानेवारीपासून शिक्षक, इतर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून शाळेची, वर्गाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करून घ्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही.  शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सर्व शिक्षक आणि कर्मचार्‍यांची कोरोना तपासणी महापालिकेच्या रूग्णालयामधून करून घ्यावी. एका बाकावर एकाच विद्यार्थ्यांला बसवावे. शाळेत येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांला पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून मास्क घालणे गरजेचे आहे. तसेच खासगी शाळा संदर्भात संस्था चालकांची एक बैठक घेतली जाईल, त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

दरम्यान, इयत्ता 9 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होवून जवळपास एक आठवडा होऊन गेला. विद्यार्थी शाळेत येण्यार्‍या विद्यार्थ्याचे प्रमाण हे आता 50  टक्क्यांपर्यंत गेले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पाचवी ते आठवीच्या महापालिका आणि खासगी मिळून एकूण 659 शाळा आहेत. यामध्ये 1 लाख 32 हजार 438  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी आणि महापालिकेचे मिळून जवळपास तीन हजार शिक्षक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *