Talegaon Dabhade news: उपनगराध्यक्षपदी भाजपाचे सुशील सैंदाणे विजयी
Pckhabar- जनसेवा विकास समितीच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचे सुशील सैंदाणे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पुरस्कृत शहर विकास समितीकडे असलेले उपनगराध्यक्षपद भाजपने पुन्हा आपल्याकडे खेचून घेतले आहे.
नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या सुशील सैंदाणे यांना 13 तर शहर सुधारणा व विकास समितीचे अरुण माने यांना सात मते मिळाली. मतदानाच्या वेळी जनसेवा विकास समितीचे सर्व नगरसेवक अनुपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत भाजपच्या वतीने सुशील सैंदाणे यांनी तर शहर सुधारणा व विकास समितीच्या वतीने अरुण माने व संतोष भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, मात्र माघारीसाठी देण्यात आलेल्या मुदतीत संतोष भेगडे यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सैंदाणे व माने यांच्या सरळ लढत झाली.
दरम्यान, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या राजकारणामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत वेगळेच चित्र पाहायला मिळेल.










Leave a Reply