Talegaon Dabhade news: उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनसेवा विकास समिती तटस्थ राहणार

 

Talegaon Dabhade news: उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनसेवा विकास समिती तटस्थ राहणार
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जनसेवा विकास समिती तटस्थ राहणार असल्याचे समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. यामुळे भारतीय जनता पक्षाचा विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची आज गुरुवारी दुपारी निवडणूक होत आहे. सभागृहात भारतीय जनता पक्ष (१२सदस्य), जनसेवा विकास समिती(७ सदस्य) व तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे (७ सदस्य) असे पक्ष बलाबल आहे.

 या निवडणुकीत जनसेवा समितीचे सदस्य तटस्थ राहणार असल्याचे संस्थापक आवारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष १२ व थेट निवडून आलेल्या नगराध्यक्ष असे १३ संख्याबळ आहे. तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे (७ सदस्य) आहेत. त्यामुळे या निवडणूकीत  विजयासाठी भारतीय जनता पक्षाला अनकूल वातावरण आहे.

या पत्रकार परिषदेला जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, नगरसेवक संग्राम काकडे, निखील भगत, रोहित लांघे, हेमलता खळदे, अनिता पवार, माजी नगरसेवक सुनील कारंडे, मिलिंद अच्युत आदि जनसेवेचे पदाधिकारी उपस्थित होते. आता पर्यंत तिन्ही गटाला उपनगराध्यक्ष पद प्रत्येकी १ वेळा मिळाले आहे. नगर परिषदेच्या या सदस्याचे या पंचवार्षिकमध्ये अखेरचे वर्ष आहे. त्यामुळे अनेकांनी हे पद मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न चालिवलेले आहेत.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *