Sports news: चौथ्या कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
चार कसोटी सामन्यांत 2-1 ने मालिका विजय
Pckhabar- वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत कसोटी मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघावर दणदणीत विजय मिळवला. चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने भारतीय संघाने मालिका जिंकली.
चौथ्या कसोटीचे गोलंदाज महम्मद सिराज, फलंदाज शुभमन गिल आणि ऋषंभ पंत विजयाचे हिरो ठरले.
प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला.
भारतानं ३ विकेट राखून हा सामना जिंकला. गॅबावर टीम इंडियाचा हा ऐतिहासिक विजय ठरला.
मोहम्मद सिराज ( ५ विकेट्स) व शार्दूल ठाकूर ( ४ विकेट्स) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव २९४ धावांवर गुंडाळला. पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाची २६ षटकं वाया गेली आणि पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता होती. ३२८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ७) माघारी परतल्यानंतर शुबमन गिल ( ९१) व चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाची गाडी रुळावर आणली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या गिलला माघारी जाताना भारतीयांनी हळहळ व्यक्त केली. इतकी सुरेख फटकेबाजी करणाऱ्या गिलचे शतक व्हायला पाहिजे होते, असे सर्वांना मनोमन वाटत होते. गिल १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावांवर बाद झाला. त्यानं पॅट कमिन्सच्या एका षटकात २० धावा चोपून काढल्या.
पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी १५ षटकांचा खेळ शिल्लक करताना टीम इंडिया बाजी मारेल असा विश्वास वाटत होता. पण, मयांक अग्रवालच्या विकेटनं ऑस्ट्रेलियन संघाला बूस्ट मिळवून दिला. मयांक ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रिषभ व वॉशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवत सामना जिंकला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. भारतानं ही मालिका २-१अशी जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली. टीम इंडियानं गॅबा कसोटी जिंकून बॉर्डर-गावस्कर चषक ( Border-Gavaskar Trophy) सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे ठेवला.










Leave a Reply