Pune news: मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून भाजप महिला आघाडीतर्फे राज्यभर आंदोलन

Pune news: मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून भाजप महिला आघाडीतर्फे राज्यभर आंदोलन

Pckhabar- बलात्काराचे आरोप असलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून भाजप महिला आघाडीतर्फे राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावाने तहसीलदार व जिल्हाधिका-यांना निवेदन देणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात दिली. 

पाटील पुढे म्हणाले, रेणू शर्मा प्रकरणाची जरुर चौकशी व्हावी. मात्र करुणा शर्मा प्रकरणाबाबत धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा न दिल्यास पक्षप्रमुख म्हणून पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली.

पवारांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारर्किदीत त्यांनी चुक करणाऱ्यांना कधीच पाठिंशी घातले नाही. त्यामुळे मुंडे प्रकरणात कारवाईची अपेक्षा आहे. तसे न झाल्यास राज्यातील 11.5 कोटी जनतेची भ्रमनिराशा होईल. असेही पाटील यांनी नमुद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *