Chikhali News: नेताजी काशीद यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Chikhali News: नेताजी काशीद यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Pckhabar-शिवसेना भोसरी विधानसभेचे उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांच्या 2022 या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात यांच्यासह युवराज कोकाटे, नेताजी काशिद, संजय गाढवे, दादा ठाकरे, हरिभाऊ लोहकरे, विजय शिवपुजे, गणेश अवचिते, दयानंद शिंदे, रमेश सांगडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी सर्व बैलगाडा मालक शेतकरी बांधवांना बरोबर कायदेशीर लढाई लढल्याबद्दल भोसरी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी श्री. आढळराव पाटील यांचा सन्मान केला.

नेताजी काशीद यांच्या कार्याचे कौतुक
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भोसरी मतदार संघात सुरु असलेल्या सामाजिक कार्याची श्री. आढळराव पाटील यांनी माहिती जाणून घेतली. तसेच चिखली प्रभागात नेताजी काशीद यांनी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेत त्यांचे विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *