Talegaon Dabhade News: तळेगाव स्टेशन भागात पाणीपुरवठा विस्कळीत

Talegaon Dabhade News: तळेगाव स्टेशन भागात पाणीपुरवठा विस्कळीत
नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे
नागरिकांना नाहक त्रास

लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी

Pckhabar- तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन भागाला पाणी पुरवठा होणाऱ्या इंद्रायणी नदी पंप हाऊस येथील दोन्ही पंप नादुरुस्त झाल्याने नागरिकांना चार ते पाच दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सुरूवातीला एक पंप
नादुरूस्त झाला असताना तो पंप त्वरित दुरूस्त केला नाही. नगरपरिषदेच्या या गलथान कारभारामुळे स्टेशन भागातील
नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर काही नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे.

इंद्रायणी नदी पंप हाऊस या ठिकाणी 100 अश्वशक्तीचे दोन पंप आहेत. या पंपाच्या साहाय्याने स्टेशन भागात पाणी पुरवठा केला जातो. त्यातील एक पंप दि. १७ डिसेंबर रोजी नादुरुस्त झाला होता. हा पंप वेळे दुरुस्त होणे गरजेचे होते. मात्र, हा पंप दुरूस्तीकडे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. या ठिकाणचा दुसरा पंपही चार दिवसांच्या अंतराने नादुरुस्त झाला. त्यामुळे स्टेशन भागातील पाणीपुरवठा चार ते पाच दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. दोन्ही पंप बिघडल्यानंतर पर्यायी पंप असणे गरजेचे आहे. मात्र, नगर परिषदेकडे याबाबत कोणत्याही प्रकारची सोय नाही.

एकाच वेळी दोन्ही पंप बिघडल्याने स्टेशन भागातील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. काही भागातील नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक नागरिकांवर आर्थिक भुर्दंड सहन करीत टँकरने पाणी घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात- लवकर पंप दुरूस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

दरम्यान, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या
पाणीपुरवठा विभागाकडे कायमस्वरूपी खातेप्रमुख नाही. प्रभारी अधिकाऱ्यावर पाणी पुरवठा विभागाचे कामकाज सुरू आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *