Dighi News : खेळाडू दत्ता घुले यांना ‘उत्कृष्ट सायकल पटू’ सन्मान

Dighi News : खेळाडू दत्ता घुले यांना ‘उत्कृष्ट सायकल पटू’ सन्मान

Pckhabar-भोसरी विधानसभेचे आमदार पै.महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक पै.विकास डोळस व युवा नेते कुलदिप परांडे यांच्या संकल्पनेतुन तसेच कमल राज ग्रुपच्या सौजन्याने दिघीतील नागरिकांना ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी उत्कृष्ट सायकल पटू खेळाडू सन्मान पिं.चि.मनपा उपमहापौर हिरा नानी घुले यांच्या हस्ते दत्ता घुले यांना देण्यात आला. यावेळी ह.भ.प.दत्ताजी आबा गायकवाड , नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी सैनिक कॅपटन अशोकराव काशिद आदी मान्यवर उपस्थित होते.

दिघीमध्ये ओपन जिम मुळे नागरिकांना शारीरिक व्यायाम करण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी मोठे खुले व्यासपीठ तयार झाले आहे. यामुळे तरुणांपासुन ते जेष्ठांपर्यत सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे.

दत्ता घुले म्हणाले ”आज खुप आनंद होत आहे. माझ्याच गावामध्ये माझा सायकलपटू म्हणुन सन्मान होत आहे.
हा सन्मान माझे मार्गदर्शक गुरुवर्य आजोबा कै.ह.भ.प.विठ्ठल घुले यांना समर्पित करत आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *