Pimpri News : नक्षलग्रस्त भागातील अनुभव ऐकण्याची संधी

Pimpri News : नक्षलग्रस्त भागातील
अनुभव ऐकण्याची संधी

रविवारी डॉ. रामचंद्र गोडबोले यांचे अनुभवकथन

Pckhabar- नक्षलग्रस्त दंतेवाडा जवळील बारसूर (छत्तीसगड राज्य) येथील अतिशय दुर्गम भागात सुमारे पंचवीस वर्षांपासून अधिक काळ नि:स्वार्थपणे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. रामचंद्र गोडबोले यांना दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या कॅप्टन कदम सभागृहात उद्योजक, लायन मनोज बन्सल यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. रामचंद्र गोडबोले यांचे अनुभवकथन ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे. तरी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्स (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २)चे अध्यक्ष नरेंद्र पेंडसे यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *