Bhosari News: प्रीतम प्रकाश महाविद्यालयात ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा
Pckhabar-भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षपूर्ती होत आहेत; यानिमित्ताने भारतात “आजादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘सविधान दिन पंधरवडा’ निमित्त रांगोळी स्पर्धा व देशभक्तीपर गीत लेखन स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन केले होते.
भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.अशोककुमार पगारिया यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. प्रफुल्लता निगडे (राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालय ) यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य वीरांच्या स्मृतींना उजळा दिला व स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण कार्य भारतीय संविधानाने केले आहे आणि करत राहील असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधाकर बैसाणे यांनी केले ; तसेच सूत्रसंचालन प्रा. रूपाली आगळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा . महालक्ष्मी शिरसाट यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.हनुमंत शिंदे, प्रा. सचिन पवार , प्रा. प्रवीण म्हस्के, प्रा.विभा ब्राह्मणकर, प्रा.उमेश लांडगे, प्रा.प्रशांत रोकडे, डॉ. स्वाती वाघ आणि शिक्षकेतर कर्मचारी सारिका बेलदोर, एकता महिंद्रकार, रूपाली मोटे यांनी परिश्रम घेतले.










Leave a Reply