Pimpri News : पिंपरी महापालिका देणार महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण

Pimpri News : पिंपरी महापालिका देणार महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजने अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण व पक्के ड्रायव्हिंग लायसन्स देण्याबाबत शिबिराचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

हे प्रशिक्षण समृद्धी मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्रांगणात या शिबिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. पक्षनेते नामदेव ढाके, महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता खुळे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसेविका योगिता नागरगोजे, साधना मळेकर, स्वाती काटे, आरती चोंधे, निर्मला कुटे, उपायुक्त अजय चारठाणकर, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, समृद्धी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सुनिल बर्गे, मनिषा बर्गे, राणी आदियाल व महिला प्रशिक्षाणार्थी यावेळी उपस्थित होत्या.

या योजनेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील २५ ते ४५ वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी दीड हजार महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. या योजनेसाठी शहरातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *