Talegaon Dabhade Accident News: दुचाकी घसरून गंभीर जखमी झालेल्या महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Talegaon Dabhade Accident News: दुचाकी घसरल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
Pckhabar- भरधाव वेगातील दुचाकी घसरल्याने एका महावितरणच्या कर्मचाऱ्याचा गंभीर जखमी होऊन रूग्णालयात उपचार असताना मृत्यू झाला आहे. हा अपघात मुंबई-पुणे महामार्गावर सोमाटणे खिंडीत 20 डिसेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडला.

भरत यशवंतराव बोरसे (वय-46, रा. सिध्दिविनायक नेस्ट, मोहन नगर, तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंधू चंद्रकांत यशवंतराव बोरसे (वय-43, रा. काकडे पार्क, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत बोरसे महावितरण मध्ये कार्यरत होते. बोरसे हे 20 डिसेंबर रोजी मुंबई-पुणे महामार्गावरून सोमाटणे खिंडीतून (एम एच-14, डी एल – 6055) या होंडा सिटी डिलक्स दुचाकीवरून जात होते. यावेळी भरधाव दुचाकीवरील बोरसे यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. बोरसे यांच्या उजव्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळावरील उपस्थित नागरिकांनी बोरसे यांना त्वरित सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, बोरसे यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, बोरसे यांच्या निधनाने सिध्दिविनायक नेस्ट सोसायटीमधील सर्व सभासदांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *