Pimpri News : मुदत संपलेले औषध, टेबलेट्स उघड्यावर टाकले; न्यूट्रिजन फार्मा व इंडिड्रॅग एजन्सींनी 25 हजारांचा दंड
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र 24 न्यूट्रिजन फार्मा व इंडिड्रॅग या एजन्सींनी मुदत संपलेले औषध बाटल्या तसेच टेबलेट्स उघड्यावर टाकल्या बाबत त्या एजन्सीला रु 25000 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. औषध विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना सूचना दिल्या.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त तथा ग क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके, प्रभारी सहाय्यक आरोग्य अधिकारी राजु बेद, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई प्रभाग क्रमांक 24 चे आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, शुभम कुपटकर व कर्मचारी अरुण राऊत, प्रशांत पवार व राजू जगताप यांच्या मार्फत करण्यात आली.










Leave a Reply