Chinchwad News : चिंचवड येथील सि .के. गोयल विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

Chinchwad News : चिंचवड येथील सि .के. गोयल विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत
Pckhabar-  चिंचवड स्टेशन येथील विकास शिक्षण मंडळाचे श्रीमती  सी. के. गोयल विद्यालया च्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर विद्यार्थ्यांनवर पुष्पवर्षाव, औक्षण, करून ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले .

कोरोना काळात पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमुळे शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या. या कालावधीत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण ऑनलाईनच गेले.इतक्या वर्षांनी शाळा आणि मित्र मैत्रिणीची भेट झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, विजय जाधव यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव देवरे, उपमुख्याध्यापक बाळू महाजन, माध्यमिक मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक प्रा. दत्तात्रय भालेराव ,शरद पटेल ,किसन अहिरे, लीला मुटकुळे, शब्बीर मोमीन व पालक व्यवस्थापन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शालेय व्यवस्थापनाने शासकीय नियमानुसार विद्यालयाचे सॅनिटायझेन करून covid-19 पासून  संरक्षित नियमावली व सूचना फलक लावण्यात आले. विद्यार्थी स्वागता पूर्वी विशेष अंतरावर चौकोन टाकून ओळीने विद्यार्थ्यांची ऑक्सी मीटर व थर्मलस्कॅनिंग तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मास्क लावण्याची व सोबत हात रुमाल, पाण्याची बाटली, व सॅनिटायझर असल्याची  खात्री करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजन अनील मुटकुळे, भाऊसाहेब पगार, पुष्पा शिंदे, नीता खैरे , अशोक देवरे,मनीषा चिखले, स्नेहल परदेशी, सारिका आदमाने, वर्षा भिटे व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *