Pimpri RTO News: परमनंट लायन्सचा कोटा वाढविण्यात आला

Pimpri RTO News: परमनंट लायन्सचा कोटा वाढविण्यात आला

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांची माहिती

Pckhabar- पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पक्क्या अनुज्ञप्तीचा (परमनंट लायन्स) कोटा वाढविण्यात आला असून २४ डिसेंबर रोजी कोटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांकरिता www.parivahan.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कोट्यामध्ये वाढ करून २४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दररोज सकाळी १० वाजता नियमित पक्क्या अनुज्ञप्तीसाठी कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जदाराने निश्चित वेळ घेऊन पक्क्या अनुज्ञप्तीसाठी उपस्थित राहावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *