Chinchwad News : अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे ‘सुशासन दिवस’

Chinchwad News : अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे ‘सुशासन दिवस’
– संयोजक सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांची माहिती
– पिंपरी-चिंचवडमधील सर्व मंडल व सर्व प्रभागात कार्यक्रम
Pckhabar-देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने सुशासन दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी दिली.

माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त २५ व २६ डिसेंबर असे दोन दिवस ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. येत्या २५ व २६ डिसेंबर रोजी शहरातील सर्व मंडल व प्रभागांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
मोरेश्वर शेडगे म्हणाले की, निमंत्रितांचे संमेलन व व्याख्यान भागातील वकील, डाॅक्टर, उद्योजक, व्यवसायिक, प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ नागरिक यांना निमंत्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विविध योजना – जनहिताचे निर्णय आदींची माहिती देणे. अटलजींच्या प्रतीमा पुजनाचा कार्यक्रम आयोजित करणे. शासकीय कार्यालयात लावण्यासाठी अटलजींचे छायाचित्र भेट देणे. अटलजींच्या कवीतांचे वाचन कार्यक्रमाचे आयोजन करणे. ग्रंथालयास अटलजींच्या पुस्तकाचे संच भेट देणे. आपल्या परीसरात स्वच्छते संबंधित कार्यक्रम व जनजागृती करणे. ई – श्रम कार्ड वितरीत करणे. अशा प्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *