Dehugaon Election News : 13 प्रभागातील 48 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद!

Dehugaon Election News :
13 प्रभागातील 48 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद!

देहू नगरपंचायतसाठी 74.97 टक्के मतदान

Pckhabar-देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 74.97 टक्के मतदान झाले.
यामध्ये 5 हजार 649 पुरुष तर 5 हजार 168 महिला अशा 10 हजार 817 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
13 प्रभागातील 48 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.

देहू नगरपंचायतीच्या 13 प्रभागासाठी आज 26 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले.

प्रत्येक मतदान केंद्रावर 5 असे 130 कर्मचारी व प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी तीन पोलीस निरीक्षक, 14 पोलीस उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक आणि 73 पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त होता.

दरम्यान, देहू नगरपंचायतीच्या 13 प्रभागातून 48 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे-13, भाजपा 13, शिवसेना 8, तर काँग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. काही प्रभागात दुरंगी, तिरंगी तर चौरंगी लढत होत आहेत.

देहू नगरपंचायतींच्या 17 प्रभागासाठी
निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने प्रभाग 11,12, 14 आणि 15 मधील निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आज 13 जागांसाठी मतदान झाले. या ओबीसींच्या चार प्रभागासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार असून सर्व जागांचा 19 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *