Dehugaon Election News: देहू नगरपंचायतसाठी पहिल्या दोन तासात 13 टक्के मतदान
Pckhabar- देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज सकाळी साडेसात पासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली. मतदारांचा उत्साह जाणवत होता. पहिल्या दोन तासात 1 हजार 801 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 13 टक्के मतदान झाले आहे.
26 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यामध्ये पुरुष मतदार 9240 तर स्त्री मतदार 8716, इतर एक असे 17 हजार 957 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदान आकडेवारी
वेळ – सकाळी 7.30 ते 9.30
पुरुष – 1084
स्त्री – 717
इतर -. ०
टक्केवारी -13 टक्के










Leave a Reply