Dehugaon Election News : देहू नगरपंचायतसाठी आज मतदान
Pckhabar- नवनिर्मित देहू नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी आज ( मंगळवार) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 26 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यामध्ये पुरुष मतदार 9240 तर स्त्री मतदार 8716, इतर एक असे 17 हजार 957 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देहू नगरपंचायतींच्या 17 प्रभागासाठी
निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने
प्रभाग 11,12, 14 आणि 15 मधील निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आज 13 जागांसाठी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर 5 असे 130 कर्मचारी व प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी तीन पोलीस निरीक्षक, 14 पोलीस उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक आणि 73 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, देहू नगरपंचायतीच्या 13 प्रभागातून 48 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे-13, भाजपा 13, शिवसेना 8, तर काँग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. काही प्रभागात दुरंगी, तिरंगी तर चौरंगी लढत होत आहेत.










Leave a Reply