Pune News : पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने 2 जानेवारीला राज्यस्तरीय चौदाव्या वधु-वर मेळावा


Pune News : पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने 2 जानेवारीला राज्यस्तरीय चौदाव्या वधु-वर मेळावा
Pckhabar-पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने 2 जानेवारी 2022 रोजी राज्यस्तरीय चौदाव्या वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 20 डिसेंबर 2021 पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुचेकर यांनी कळविले असल्याचे संघाचे सचिव विजय भोजने यांनी सांगितले.

रहाटणी, रामनगर येथील थोपटे लॉन्समध्ये 2 जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हा मेळावा होणार आहे. मेळाव्यास महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातून धनगर समाजातील सर्व शाखेतील उपवधू-वर, त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत. शिक्षित, उच्चशिक्षित मुला-मुलींना योग्य जोडीदाराची निवड करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी नोंदणी शुल्क 500 रुपये आहे.

मेळाव्यानिमित्ताने प्रकाशित होणा-या वधू-वर परिचय मेळावा या अंकात पाल्यांची नोंद करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. नोंदणीची व्यवस्था संस्थेच्या काळेवाडी, तापकीरनगर येथील सॅण्डविक गृहनिर्माण सोसायटी येथे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *