Hinjewadi Crime News : मुलगी अल्पवयीन असताना लावले लग्न, आई-वडिलांसह 8 जणांवर गुन्हा

Hinjewadi Crime News : मुलगी अल्पवयीन असताना लावले लग्न, आई-वडिलांसह 8 जणांवर गुन्हा


Pckhabar-मुलगी अल्पवयीन असताना 36 वर्षांच्या व्यक्तीबरोबर लग्न लावून दिल्यानंतर तिचा हुड्यासाठी छळ करणार्‍या सासरच्या मंडळींसह आई-वडिल आणि लग्न लावणार्‍या ब्राम्हणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बाणेर येथे उघडकीस आली.

18 वर्षीय मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पती बालाजी दत्त्तात्रय कांबळे (वय-36), सासरे दत्तात्रय शंकर कांबळे (वय-65), सासू धनाबाई दत्तात्रय कांबळे, (वय-60, तिघे रा. सातोली, करमाळा), वडील बाळासाहेब अर्जुन साबळे (वय-42), आई निर्मला बाळासाहेब साबळे (वय-40, दोघे रा. घरकुल चिखली), नंदावा सिध्देश्वर बनसोडे, ननंद रोहिणी सिध्देश्वर बनसोडे (दोघेही रा. पिंपळे निलख) आणि ब्राम्हण अशा आठ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन असताना 2019 मध्ये आरोपी बालाजी कांबळे याच्याबरोबर तिचे लग्न लावण्यात आले. त्यानंतर आरोपी पती, सासू आणि सासरे यांनी दुचाकी घेण्यासाठी व 2 लाख हुड्यांची मागणी करून फिर्यादीचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. तसेच तिला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. या त्रासाला कंटाळून फिर्यादी आई-वडिलांकडे राहण्यास आली. मात्र, आई-वडिलांनीही फिर्यादीला हाताने मारहाण केली. फौजदार बोरकर अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *