Dehugaon political News : देहू नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आज प्रचाराचा शुभारंभ

Dehugaon political News : देहू नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आज प्रचाराचा शुभारंभ

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या
देहू नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा यापुर्वीच नारळ फुटला असून आज (मंगळवार) दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते नारळ वाढवून राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

देहूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांसह देहूगाव मधील स्थानिक नेते, पक्षाचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

देहूगाव नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे-13 , भाजपा 13, शिवसेना 8, तर काँग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आजपासून प्रचाराला अवघे सहा दिवस शिल्लक आहेत.

राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे देहू नगरपंचायत निवडणूकीत मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *