Dehugaon Nagar Panchayat Election News : 13 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात

Dehugaon Nagar Panchayat Election News : 13 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात
10 उमेदवारांची माघार


Pckhabar- देहू नगरपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत काँग्रेसच्या एका उमेदवारासह 10 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 13 जागांसाठी 48 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 82 जणांनी अर्ज दाखल केले होते. छावणीमध्ये एका काँग्रेसच्या एका उमेदवारासह 20 उमेदवारांचे अर्ज अवैध तर ६२ जणांचे अर्ज वैध ठरले होते.

उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत काँग्रेसच्या शहराध्यक्षा वनिता देशकर यांचा प्रभाग क्रमांक 13 मधून आणि प्रभाग अनुक्रमे 3 मध्ये 3, 4-1, 7-1, 10-1, 16-1 तर 17-1 अशा नऊ अपक्षांनी उमेदवारी माघार घेतल्याने तेरा प्रभागातून 48 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे-13 , भाजपा 13, शिवसेना 8, तर काँग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.

दरम्यान, अपक्ष उमेदवारांना आता चिन्ह वाटप होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *