Chikhali Accident News : भरधाव स्कॉर्पिओने दाम्पत्याला उडविले, दोघांचाही मृत्यू

Chikhali Accident News : भरधाव
स्कॉर्पिओने दाम्पत्याला उडविले, दोघांचाही मृत्यू

चिखली-देहू रोडवर अपघात

Pckhabar-भरधाव वेगातील स्कॉर्पिओने मोपेडवरून जाणार्‍या एका दाम्पत्याला उडविले. या अपघातात दाम्पत्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता चिखली-देहू रोडवर घडला.

बाळू बाबुराव उगवे (वय-63), मिरा बाळू उगवे (वय-52, दोघेही रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा  मनोज बाळू उगवे (वय-32) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  (एमएच-12, बीपी 6269) या स्कॉर्पिओ वरील चालक नेताजी भिसे (रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आई-वडिल चिखली-देहू रोडवरून (एमएच 14, ई.एस. 0442) या मोपेडवरून जात होते. शेलारवाडी येथील हिंदुस्थान वजन काट्यासमोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव स्कॉर्पिओने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन उगवे दाम्पत्याचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *