Hockey News : शहराचा क्रीडानगरी म्हणून नावलौकीक मिळवण्यासाठी राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा महत्वपूर्ण: महापौर

Hockey News : शहराचा क्रीडानगरी म्हणून नावलौकीक मिळवण्यासाठी राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा महत्वपूर्ण: महापौर

११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्या उद्घाटन


Pckhabar-पिंपरी चिंचवड शहराला औद्योगिकनगरी बरोबरच क्रीडानगरी म्हणून नावलौकीक मिळवण्यासाठी राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा महत्वपूर्ण ठरणार असून क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.

हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने ११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ चे आयोजन दि. ११ ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे करण्यात आले आहे. या निमित्त महापौर ढोरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्या अपर्णा डोके, शारदा बाबर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, हॉकी महाराष्ट्राचे सरचिटणीस मनोज भोरे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ चा उद्घाटन समारंभ महापौर ढोरे यांच्या हस्ते शनिवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे.

११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ या स्पर्धेमध्ये होणा-या एकुण ५० सामन्यांमध्ये एकुण ३० राज्यांचे संघांमधील ७५० खेळाडू सहभागी होणार असून, ४० पंच, ८ सिलेक्टर, १० पदाधिकारी व ९० स्वयंसेवक स्पर्धेचे कामकाज पाहणार आहेत.

११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ चे आयोजनकामी मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर येथील कायमस्वरूपी लागणा-या सुविधांचा खर्च, स्थापत्य क्रीडा यांचे कडून स्थापत्य विषयक कामाकरिता र.रू.२.७५ कोटी, विद्युत विभाग “ह” क्षेत्रिय कार्यालय यांचे कडून विद्युत विषयक कामांकरीता र.रू.१.८४ कोटी व क्रीडा विभागाकडून खेळाडू व पंच पदाधिकारी यांची वाहतूक व्यवस्था, पी.व्ही.सी फ्सेक्स बॅनर्स छपाई, क्रीडा साहित्य खरेदी इ. कामी र.रू.२१,०४,८५४/- व माहीती व जनसंपर्क विभाग यांचेकडून एल.ई.डी व्यवस्था कऱणे कामी र.रू.११,२१,१२०/- इतका खर्च असा एकुण र.रू.४,९१,२५,९७४/- इतका खर्च येणार आहे.

११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ या स्पर्धेकरीता दि.११/१२/२०२१ ते दि.२१/१२/२०२१ या काळात श्री.मनोज भोरे, सर चिटणीस, हॉकी महाराष्ट्र श्री.राजिंदर सिंग, सर चिटणीस, हॉकी इंडिया व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांचे सहकार्य लाभणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *