Pimpri News : पिंपरीत आज ’10 वा नोकरी व कौशल्य विकास’ मेळावा

प्रकल्प प्रमुख, लायन अशोक येवले यांची माहिती
Pckhabar-लायन्स क्लब इंटरनॅशनल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्टाफब्लूम यांच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत व एक्सपोनेन्सील इंजिनीरिंग यांच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत पिंपरीत आज 10 वा ‘नोकरी व कौशल्य विकास’मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख आणि लायन अशोक येवले यांनी दिली आहे.
आज (गुरूवार) सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पिंपरीतील कामगार भवनाच्या शेजारील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात 8 वी / 10 वी / 12 वी / DIPLOMA / ITI / GRADUATE मुले, मुली सहभागी होऊ शकतात. निवड होणाऱ्या मुला-मुलींसाठी : रु9,000/- ते रु 15,000 पर्यंत पगाराची संधी असणार आहे.
अधिक माहितीसाठी 7558562963/8956140702 recruiter@staffbloomglobal.com येथे संपर्क साधावा.











Leave a Reply