Pimpri RTO News :वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण निर्धारीत वेळेत करण्याचे आवाहन
Pckhabar-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पिंपरी-चिंचवड येथे परिवहन संवर्गातील वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाबाबत ऑनलाईन पूर्ववेळ घेण्याचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी नियोजित तारीख घेऊन महिन्याच्या प्रत्येक शनिवारी योग्यता प्रमाणपत्राच्या कामकाजासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे.
परिवहन संवर्गातील वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी कार्यालयात मालवाहतूक वाहनांसाठी १५४, टुरिस्ट टॅक्सी ३४, ऑटारिक्षा २९, तीन चाकी मालवाहतूक वाहने ६ आणि बस २३ याप्रमाणे कोटा ठरविण्यात आला आहे. वाहनधारकांनी योग्यता प्रमाणपत्र आणि वाहन तपासणीसाठी प्रत्येक शनिवारी पूर्ववेळ घेऊन वाहनासह कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.










Leave a Reply