Dehugaon Political News : देहूगाव नगरपंचायत निवडणूक ; ‘हे’ आहेत भाजपचे अधिकृत 13 उमेदवार

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायती निवडणूकीसाठी
भारतीय जनता पक्षाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत 13 उमेदवारांची नावे आज (मंगळवार) जाहीर केली आहेत. या उमेदवारांना पक्षाचा अधिकृत एबी फाॅर्म
देण्यात आल्याची माहिती देहूगाव भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने देहू नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तर ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने ओबीसींच्या प्रभाग 11, 12, 14, 15 मधील निवडणूक स्थगित झाली आहे.
चार प्रभाग वगळून निवडणूक होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी उमेदवारांची नावे फायनल केली आहेत.
भाजपचे उमेदवार आणि प्रभाग क्रमांक पुढीलप्रमाणे:
1) नरेंद्र बाळासाहेब कोळी
2) शितल सचिन मराठे
3) प्रतिक्षा सुभाष जाधव
4) प्रणव जयंत कसबे
5) तुकाराम मारूती काळोखे
6) योगिता नागेश काळोखे
7) नितीन किसन हगवणे
8) पूजा सुमित काळोखे
9) स्वाती संतोष चव्हाण
10) सुहास बबनराव गोलांडे
13) अनिता सचिन मुसुडगे
16) प्रद्युम्न राजेश टिळेकर
17) अरूणा मच्छिंद्र परंडवाल











Leave a Reply