Dehugaon Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत 13 उमेदवारांची नावे जाहीर

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायती निवडणूकीसाठी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत 13 उमेदवारांची नावे आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली आहेत. या उमेदवारांना पक्षाचा अधिकृत एबी फाॅर्म देण्यात आल्याची माहिती देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देहू नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
17 जागांसाठी तब्बल 61 इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. तर ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने ओबीसींच्या प्रभाग 11, 12, 14, 15 मधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. हे चार प्रभाग वगळून निवडणूक होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि प्रभाग क्रमांक पुढीलप्रमाणे:
1) मीना राहुल कुर्हाडे
2) रसिका स्वप्नील काळोखे
3) पुजा अमोल दिवटे
(4) मयूर दत्तात्रय शिवशरण
5) अभिजीत अभिमन्यू काळोखे
6) पुनम विशाल काळोखे
7) प्रा. विकास दशरथ कंद
(8) रत्नमाला साहेबराव कारंडे
9) स्मिता शैलेश चव्हाण
10) सुधिर सुरेश काळोखे
13) प्रियंका अभिजित मोरे
16) योगेश बाळासाहेब परंडवाल
17) ज्योती गोविंद टिळेकर










Leave a Reply