Pimple Gurav News : न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य थोर : शोभाताई आदियाल

Pimple Gurav News : न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य थोर : शोभाताई आदियाल

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन


Pckhabar-भारताचे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य थोर आहे. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांवरील (दलित) सामाजिक भेदभावाविरुद्ध मोहीम सुरु केली. तसेत कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. भारतासारख्या सर्वात मोठ्या भारतीय राज्यघटनेचे जनक आणि प्रजासत्ताक भारताचे ते शिल्पकार होते, असे प्रतिपादन माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांनी केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक येथील जय भीम चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एकत्रितरित्या बुद्धवंदना घेण्यात आली. परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. त्यावर फुलांची आरास करून मेणबत्या पेटविण्यात आले होते.
माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, सामाजिक कार्यकर्ते मुकेश पवार, अमरसिंग आदियाल, मानसिंग आदियाल, गणेश जगताप, राहुल काकडे, ऍड. राजेश नितनवरे, चौधरी साहेब, तानाजी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष श्याम जगताप, युवा नेते तानाजी जवळकर, नयन अहिरे, पिल्लेवार, रोहन लोखंडे, टिका शेठ आदी मान्यवर, तसेच परिसरातील नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
शोभाताई आदियाल यांनी सांगितले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भरीव कामगिरी केली आहे. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी जातीवाद दूर करण्यासाठी गरीब, दलित, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *