Hinjewadi Crime News : क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याचे अमिष दाखवून एकाला घातला गंडा

Pckhabar- क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याचे अमिष दाखवून एकाकडून ओटीपी घेऊन त्याआधारे क्रेडिट कार्डवरून 2 लाख 10 हजार रूपयांचे ऑनलाईन ट्रान्झेक्शन करून फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे नुकताच उघडकीस आला.
संजयकुमार हेमराज राहांगदाले (वय-53, रा. स्लेंडर मेगापोलीस सोसायटी, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 919554085609 व 9118601801290 या मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी 919554085609 व 9118601801290 या मोबाईल धारकांनी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या एसबीआय क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून देण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर त्यांच्या कार्डचा नंबर, एक्स्पायरी तारीख, मोबाईलवर आलेले ओटीपी घेऊन त्याव्दारे Housing.com http://housin IND ́É PTM*PAYTM NOIDA UTT या अकाऊंटवर 2 लाख 10 हजार 268 रूपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. पोलीस निरीक्षक गुन्हे दहीफळे अधिक तपास करत आहेत.







Leave a Reply