Talegaon Dabhade News : ओपन जीमचा तरूणांनी लाभ घ्यावा: विरोधी पक्षनेते गणेश काकडे

Talegaon Dabhade News : ओपन जीमचा तरूणांनी लाभ घ्यावा: विरोधी पक्षनेते गणेश काकडे

प्रभाग क्रमांक 3 मध्ये उद्यानाचे भूमिपूजन, विकास कामाचे लोकार्पण

Pckhabar- ”बदलत्या जीवनशैलीमुळे तरूण वयातच अनेकांना आजार होऊ लागले आहेत. तरूणांनी स्वत: साठी वेळ काढून व्यायाम करणे गरजेचे आहे.
ओपन जीमची संकल्पना खूप चांगली असून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात याला तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रभाग 3 मधील नागरिक, तरुणांसाठी ओपन जीम सुरू करण्यात आली असून या जीमचा जास्तीत जास्त तरूणांनी लाभ घ्यावा,”असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केले आहे.

तळेगाव दाभाडे येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिमको काॅलनीत उद्यानाचे भूमीपूजन, सत्यकमल कॉलनीत ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी तर वनश्री नगर येथील श्रीरंग कला निकेतन येथे लहान मुलांसाठी खेळणीचे गुरूवारी लोकार्पण करण्यात आले.

गुरूवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत, नगरसेवक रोहित लांघे, माजी नगरसेवक सुनिल कारंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही सर्व कामे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांच्या प्रयत्नातून झाली आहेत.

प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिमको काॅलनीतील सिद्धिविनायक नेस्ट सोसायटी समोर उद्यानाचे भूमीपूजन, सत्यकमल कॉलनीत ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी तर वनश्री नगर येथील श्रीरंग कला निकेतन येथे लहान मुलांसाठी खेळणीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *