Dehugaon News : देहू नगरपंचायत निवडणुक कार्यालय परिसरात कलम 144 लागू

Pckhabar-राज्य निवडणूक आयोगाने नवनिर्मित देहू नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 13 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी तसेच अर्ज मागे घेणे असे निवडणूक प्रक्रियेचे कामकाज चालणार आहे. देहूगावातील वैकुंठ गमन मंदिराशेजारील भक्त निवासामध्ये निवडणूक प्रक्रियेचे कामकाज होणार आहे. हे कामकाज सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी भक्त निवासापासून 200 मीटर परिक्षेत्रात कलम 144 लागू करण्यात आले आहेत.
याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश काढला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना आत जाण्यास परवानगी राहणार आहे. या ठिकाणी कोणताही प्रचार, सभा अथवा घोषणाबाजी करण्यास मनाई आहे.











Leave a Reply